स्वामीजींचा परिचय
हिमालयातील निर्जन गुफामध्ये वर्षानुवर्षे ध्यान‑तप करत, नेपाळमार्गे चीन‑तिबेट पायी यात्रा करीत आणि त्यातून भारताच्या प्राचीन योग‑सनातन परंपरेचा जगासमोर परिचय करून देणारे श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरीजी महाराज हे एक अद्वितीय तपस्वी आणि युगपुरुष म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या जीवनात केवळ ध्यान आणि अध्यात्मिक उन्नतीच नव्हे तर समाजाच्या कल्याणासाठी अनेक कार्ये करत अतुलनीय सेवेची स्थापना केली. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी भांगसी माता गडाचा जीर्णोद्धार केला, ज्यामुळे या ऐतिहासिक गडाचा गौरव पुनरुज्जीवित झाला. तसेच त्यांनी गुरुकुल बांधून विद्यार्थ्यांना संस्कार आणि शिक्षण दिले. गोशाळा उभारून त्यांनी गायींची सेवा आणि संरक्षण केले. सर्व उपक्रमांना अधिष्ठान मिळाले ते त्यांनी उभारलेल्या प्राचीन स्थापत्यकलेच्या गौरवमय हेमाडपंती पशुपतयेश्वर महादेव मंदिरातून, ज्यामुळे भक्तांना प्राचीन स्थापत्यकलेचा आणि साक्षात शिवतत्त्वाचा अनुभव एकाच वेळी घेता येतो.
स्वामी परमानंदगिरिजी महाराज हे एक संत तर आहेच, त्याचबरोबर ते समाजसुधारकही आहेत, ज्यांनी आपल्या वचनांनी आणि क्रियांनी लोकांना आध्यात्मिक जागृतीसाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अध्यात्म आणि संस्कृतीची उजळणी झाली आहे.
अधिक माहितीसाठी क्लीक करा